breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,35,636 वर

  • मुंबईत 631, पुण्यात 572 नवे रुग्ण

मुंबई – शुक्रवारी दिवसभरात आढळलेल्या 3,524 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,35,636 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 4,279 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 59 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 18,32,825 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 49,580 वर पोहोचला आहे. तर सध्या 52,084 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,03,05,788 वर

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे 631 नवे रुग्ण आढळले, तर 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,94,067 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,125 इतका झाला आहे. तसेच काल 628 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,74,072 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 8,005 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 572 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,63,551 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,822 इतका झाला आहे. तसेच काल 740 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,48,858 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 572 रुग्णांपैकी पुणे शहरातील 302, पिंपरी-चिंचवडमधील 120 आणि पुणे ग्रामीण भागातील 113 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button