breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,59,367 वर

  • मुंबईत 585, पुण्यात 567 नवे रुग्ण

मुंबई – मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या 4,026 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,59,367 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 6,365 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 53 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,37,080 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 47,827 वर पोहोचला आहे. तर सध्या 73,374 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 585 नवे रुग्ण आढळले, तर 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,87,175 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,920 इतका झाला आहे. तसेच काल 565 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,63,354 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 12,077 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 567 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,48,862 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,525 इतका झाला आहे. तसेच काल 924 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,30,072 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 567 रुग्णांमध्ये 279 रुग्ण हे पुणे शहरातील असून 132 रुग्ण पिंपरी-चिंचवड आणि 115 रुग्ण ग्रामीण भागातील व 41 रुग्ण कंटेनमेंट झोनमधील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button