breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

फेमस Youtuber चा एक्सप्रेस-वे वरील अपघातात मृत्यू

३०० च्या स्पीडने बाईक चालवने पडले महागात

उत्तरप्रदेशच्या अलीगढमधील यमुना एक्स्प्रेस वेवर रेसिंग बाइक चालवणाऱ्या युट्यूबरचा अपघाती मृत्यू झाला आहे. युट्युबर अगस्त्य चौहान हा कावासाकी या रेसर बाइकवरून आग्राहून दिल्लीला जात होता. तो सुमारे ३०० किलोमीटर प्रतितास या वेगाने रेसिंग बाइक चालवत होता. दरम्यान, त्यांची रेसर बाइक अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. गाडीचा वेग खुप असल्यामुळे त्याच्या हेल्मेटचा चुरा झाला. त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

अगस्त्य चौहान हा डेहराडून, उत्तराखंडचा रहिवासी आहे. त्याचे PRO RIDER १००० नावाचे यूट्यूब चॅनल आहे. ज्यावर करोडो प्रेक्षक आणि लाखो सबस्क्राइबर्स आहेत. हा अपघात यमुना एक्सप्रेसवे ४७ मैल पोलीस स्टेशनच्या परिसरात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अगस्त्याने १६ तासांपूर्वी त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला होता. यासोबतच त्याने त्याच्या मित्रांनाही दिल्ली गाठण्यास सांगितले होते. दिल्लीमधून बाईक राईड सुरु करायची होती. बाईक चालवतानाही अगस्त्य चौहान व्यावसायिक व्हिडिओ बनवत असे. मात्र, त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये डिस्क्लेमरही टाकला होता, तसेच वेगाने दुचाकी न चालवण्याचा इशाराही दिला होता.

अगस्त्य चौहान याने यूट्यूब चॅनलवर वाहतूक नियमांचे पूर्णपणे पालन करा आणि एका मर्यादेतच बाइक चालवा असं लिहलं आहे. पण, अगस्त चौहानसाठी बुधवारची बाईक राइड जीवघेणी ठरली आहे. दिल्लीत होणाऱ्या लाँग राईड स्पर्धेसाठी अगस्त्य चौहान रवाना झाला होता. यासाठी त्याने त्याची ZX कावासाकी बाइक सुद्धा बदलून घेतली होती.

मात्र, यादरम्यान तो बाईक चालवताना व्हिडिओ बनवत होता. त्याने स्वत: व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याने यापूर्वी कधीही ३०० च्या स्पीडने बाईक चालवली नाही, परंतु यावेळी ते करण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते दुभाजकावर आदळला. यामध्ये त्याचे निधन झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button