breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17,14,273 वर

  • मुंबईत 576, पुण्यात 441 नवे रुग्ण

मुंबई – शनिवारी दिवसभरात आढळलेल्या 3,959 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17,14,273 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 6,748 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 150 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15,69,090 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 45,115 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 99,151 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत शनिवारी कोरोनाचे 576 नवे रुग्ण आढळले, तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 245 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,63,052 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,419 इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत 2,35,657 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 16,262 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 441 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,27,566 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 8,068 इतका झाला आहे. तसेच काल 772 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,08,728 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 441 रुग्णांपैकी 169 रुग्ण हे पुणे शहरातील असून 97 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत, तर 121 रुग्ण ग्रामीण भागातील आणि 54 रुग्ण कंटेन्मेंट झोनमधील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button