TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

विद्यापीठ विधिसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विविध संघटनांची मागणी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विधिसभा निवडणुकीच्या विविध प्रक्रियांकरिता दिलेला कालावधी अपुरा आहे, असा आक्षेप विविध संघटनांनी घेतला. या वेळापत्रकात बदल करावे, अर्जांसाठीची मुदत वाढवून द्यावी आणि निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागपूर विद्यापीठाने विधिसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार, जुन्या मतदारांना ‘बी फॉर्म’ भरण्यासाठी तसेच ‘ए फॉर्म’वर आक्षेप घेण्यासाठी केवळ पाच दिवस दिले आहेत. हा निर्णय अन्यायकारक आहे, नवीन नोंदणीसाठीतीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. जुन्या मतदारांचे ‘बी फॉर्म’ भरण्यासाठी दिवाळीच्या सुट्यांमधील केवळ पाच दिवस देण्यात आले आहेत.

नागपूर जिल्हा तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मतदारांसाठी हा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे ‘बी फॉर्म’ भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. या संघटनांमध्ये सिनेट परिवर्तन पॅनल, शिक्षक भारती संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन, भीम आर्मी, बुद्धिस्ट स्टुडंट्स असासेसिएशन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, प्रहार जनशक्ती अशा विविध संघटनांचा समावेश आहे.

या संघटनांच्या प्रतिनिधींनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची भेट घेऊन त्यांना या मागण्यांसंदर्भात निवेदनही दिले. शिष्टमंडळात माजी विधिसभा सदस्य प्रा. प्रशांत डेकाटे, सपन नेहरोत्रा, शीलवंत मेश्राम, उत्तम शेवडे, अंकित राऊत, अमोल थूल, शबाना शेख, राजेश बोढारे, आशिष तितरे, नीलेश महूरकर, श्यामराव हाडके, सिद्धार्थ फोपरे, सुनील लांडे आदींचा समावेश आहे. मुदतवाढ न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधर गटाकरिता विद्यापीठाने जाणीवपूर्वक ‘बी फॉर्म’ भरण्यासाठी केवळ पाच दिवसांची मुदत दिली होती. परंतु, दिवाळीच्या कालावधीत अनेक मतदार ‘बी फॉर्म’ भरू शकले नाहीत. विद्यापीठाच्या अशा तुघलकी कारभारामुळे नोंदणीकृत जुन्या पदवीधर मतदारांच्या मतदानाचा अधिकारावर गदा आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने आणखी किमान दहा दिवस ‘बी फॉर्म’ भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. – डॉ. प्रशांत इंगळे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र प्राध्यापक सेना.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button