breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक प्रवाशांना आज मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरी भागांवर आज मेगाब्लॉक घेणार आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व ठाणे ते कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील.

तसेच कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ पर्यंत सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा कल्याण ते ठाणे दरम्यानच्या सर्वस्थानकांवर थांबून पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत सुटणाऱ्या बेलापूर, पनवेल आणि वाशीसाठीच्या डाऊन हार्बरमार्गावरील सेवा रद्द असतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल विभागात विशेष गाड्या धावतील. त्याचबरोबर हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत ट्रान्सहार्बर लाइन/मेन लाइन मार्गे प्रवास करण्याची परवानगी राहील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button