breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : फायनलच्या तिकिटासाठी झुंज; आज हैदराबाद-दिल्ली भिडणार

अबुधाबी – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत प्ले ऑफच्या तिसऱ्या लढतीत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये मुकाबला रंगणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दाखल होईल आणि मंगळवारी आयपीएल चषकासाठी मुंबई इंडियन्सविरोधात खेळेल. तर आज पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आजची लढत दोन्ही संघांसाठी ‘जिंकू किंवा मरू’ अशीच आहे. यापूर्वी उभय संघांमध्ये झालेल्या दोन्ही लढतीत हैदराबादनेच विजय मिळविला होता. त्यामुळे आज तरी दिल्ली हैदराबादवर भारी पडणार की पुन्हा हैदराबादच जिंकणार हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.

गेल्या काही सामन्यातील शानदार कामगिरी पाहता कागदावर तरी हैदराबादचेच पारडे जड आहे. तर दिल्लीने दुसऱ्या टप्प्यातील शेवटच्या साखळी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बंगळुरूला पराभूत करून आपले प्ले ऑफमधील तिकीट पक्के केले होते. परंतु त्याआधी सलग चार सामन्यांत दिल्लीला हार खावी लागली होती. आता दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर दिल्लीला प्रथमच अंतिम फेरीपर्यंत नेण्यास उत्सुक आहे, तर वॉर्नर २०१६नंतर हैदराबादला दुसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे निश्चित.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button