breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,92,693 वर

मुंबई – मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या 4,909 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 16,92,693 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 6,973 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 120 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15,31,277 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 44,248 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 1,16,543 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 746 नवे रुग्ण आढळले, तर 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,59,860 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,320 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 939 जण कोरोनामुक्त झाल्याने मुंबईत आतापर्यंत 2,31,541 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या 17,444 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 546 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,25,212 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7,955 इतका झाला आहे. तसेच काल आढळलेल्या 546 रुग्णांपैकी 247 रुग्ण हे पुणे शहरातील असून 133 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहराची रुग्णसंख्या आता 1,62,091 वर पोहोचली असून पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 88,129 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button