breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,64,615 वर

  • मुंबईत 2,119, पुण्यात 1,197 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. गुरुवारी आढळलेल्या 10 हजार 226 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 15 लाख 64 हजार 615 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 337 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 41 हजार 196 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 13 हजार 714 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 13 लाख 30 हजार 483 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 92 हजार 459 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 2 हजार 119 नवे रुग्ण आढळले, तर 46 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 36 हजार 725 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 598 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 1 हजार 970 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईतील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 03 हजार 467 इतकी झाली आहे. तर सध्या 20 हजार 922 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 1 हजार 197 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 11 हजार 627 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 335 इतका झाला आहे. दरम्यान, गुरुवारी आढळलेल्या 1 हजार 197 नव्या रुग्णांपैकी 549 रुग्ण पुणे शहरातील असून 322 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 56 हजार 144 वर पोहोचली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 84 हजार 886 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button