breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

रोलबॉल खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये करावा

संदीप खर्डेकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

पुणे : रोलबॉल हा खेळ सध्याच्या घडीला ६० पेक्षा अधिक देशांमध्ये खेळला जात आहे. या खेळाची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. असे असताना देखील या खेळाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या राज्याच्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये अजूनही या खेळाचा समावेश झालेला नाही. त्यामुळे रोलबॉल या खेळाचा शिवछत्रपती पुरस्कारामध्ये व त्याबरोबरीने नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण खेळाच्या यादीमध्ये समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली.

यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केलेल्या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

रोलबॉल या खेळास क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच महराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे. त्याबरोबरीने केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त क्रीडा संस्थांच्या भारतीय खेळांच्या यादीमध्ये देखील रोलबॉलचा समावेश करण्यात आला आहे. तसेच एसजीएफआय आणि ऑल इंडिया युनिव्हार्सिटी यामध्ये देखील या खेळाला मान्यता आहे.

हेही वाचा – लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन, डेक्कन क्वीन २० मिनिटे रोखली

या विषयावर बोलताना संदीप खर्डेकर म्हणाले, राजस्थान, मध्य प्रदेश, छात्तीसगड, गुजरात या महाराष्ट्रच्या शेजारील राज्यांमध्ये तसेच इतर राज्यांमध्ये त्या त्या राज्य सरकारचे क्रीडा पुरस्कार, रोख पारितोषिके, नोकरीमध्ये आरक्षण तेथील रोल बॉलच्या खेळाडूंना मिळत आहे. आपल्या राज्यात या खेळाचे उगमस्थान महाराष्ट्र असून महाराष्ट्रातील खेळाडू राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी करून देखील या सर्व गोष्टीन पासून वंचित रहात आहेत.

राज्यातील विविध खेळाडू संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जिल्हा स्तरीय, विभाग स्तरीय, राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत देखील चमकदार कामगिरी करत आहेत. खेळाच्या झालेल्या विश्व करंडक स्पर्धेमध्ये देखील राज्याच्या खेळाडूनी शानदार कामगिरी करताना भारतीय संघाला विश्वकरंडक मिळवून दिला आहे. मात्र, या खेळाडूना अजूनही प्रशासकीय स्तरावर गौरविण्यात आलेले नाही. त्यामुळेच या खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये झाल्यास या उद्यान्मुख खेळाडूंना याचा लाभ होवू शकेल, असे खर्डेकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button