breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

कोविड काळात आर्थिक घोटाळा? भाजप आमदार आशिष शेलार यांची हायकोर्टात याचिका

कोरोना काळात रुग्णालयांना पुरविण्यात येणाऱ्या औषधं आणि जंतुनाशकाच्या खरेदी प्रक्रियेत आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. यासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून हायकोर्टानं पालिका प्रशासन आणि राज्य सरकारला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधं आणि जंतुनाशक खरेदी करण्यासाठी पालिका प्रशासनाने 21 ऑगस्ट 2020 रोजी निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, ही निविदा प्रक्रिया जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अटींशी सुसंगत नसल्याचा आरोप केला आहे. या याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली.

यासंदर्भात सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच भविष्यात औषधे, जंतुनाशक आणि इतर वैद्यकीय उपकरणांसह सर्व वैद्यकीय साहित्यांची खरेदी करण्यासाठी केंद्रीय दक्षता समितीच्या (सीव्हीसी) मार्गदर्शक तत्त्वांचे आणि अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश पालिका आणि राज्य सरकारला देण्यात यावेत, अशी विनंतीही याचिकेतून करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button