breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३,५१,१५३ वर

  • मुंबईत २,०५५, पुण्यात १,३३३ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा विळखा दिवसागणिक प्रचंड घट्ट होत आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात ११ हजार ९२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १८० कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. तसेच एका दिवसात १९ हजार ९३२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या १३ लाख ५१ हजार १५३ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १० लाख ४९ हजार ९४७ जण कोरोनामुक्त झाले असून ३५ हजार ७५१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर सध्या २ लाख ६५ हजार ३३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल २ हजार ५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ४० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १ हजार ९४४ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख ७७५ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ८ हजार ८३१ इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत १६ लाख ४८ हजार ८८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात सोमवारी १ हजार ३३३ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७७ हजार ६५८ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ६ हजार ३६७ इतका झाला आहे. तर दिवसभरात २ हजार ६४ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यातील कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा २ लाख ३० हजार ५४० वर पोहोचला आहे. तसेच सध्या १७ हजार २२८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button