breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: हजारो कुटुंबांच्या पोटाचा विचार करणाऱ्या आमदार सुनील शेळकेंची अन्नछत्रालयावर न्यहारी

– मदत नव्हे कर्तव्य उपक्रमांतर्गत् नवलाख उंब्रे येथे अन्नछत्रालय

– सामाजिक भान जपणाऱ्या आमदारांची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा

मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये कष्टकरी, मजुरांची उपासमार होवू नये. यासाठी मावळ तालुक्यात सुमारे २० हजार कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल इतका जीवनावश्यक वस्तुंचा संच देणारे आमदार सुनील शेळके यांची न्यहारी सध्या अन्नछत्रालयावर होताना दिसते.

          ‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत  जीवनाश्यक वस्तुंचे वाटप, मोफत भाजीपाला, पोलिसांना सुरक्षा कीट वाटप यासह तालुक्यात सहा ठिकाणी अन्नछत्रालय सुरू करण्यात आले आहे. मुंबई, पुणे-पिंपरीच्या शेजारीच असलेल्या मावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी-प्रशासनाने केलेल्या अचूक उपाययोजना आणि नागरिकांची सतर्कता यामुळे कोरोना तालुक्यातून हद्दपार राहिला आहे. मावळातील सोशल डिस्टंस्टिंग उपक्रमांची महाराष्ट्रभर चर्चा झाली. आमदार शेळके याकामी जातीने लक्ष घातल आहेत.

          दरम्यान, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्तींच्या सहकार्य सुरू केलेल्या उपक्रमांचा लाभ तळागाळातील नागरिकांना होतोय की नाही? याची माहिती घेत आमदार शेळके संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी भेट देत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याबाबत वाडी-वस्तीवर जनजागृती सुरू आहे. त्यामुळे प्रवास नित्याचा झाला आहे. मग, रोजच्या धावपळीत मिळेल त्या ठिकाणी उदरभरण आलीच. त्याची प्रचिती नवलाख उंब्रेमधील ग्रामस्थांना सोमवारी आली.

नवलाख उंब्रे येथील अन्नछत्रालयास सोमवारी आमदार शेळके यांनी भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, मा.पं.स.सदस्या ललिता कोतुळकर, राजु पडवळ, तानाजी पडवळ, नवनाथ पडवळ, राजु कडलक, विशाल पडवळ, देविदास पडवळ, पप्पु शिंदे, सुनिल शेटे, दिनकर शेटे, सुनिल गायकवाड, संदिप गराडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पहायला मिळालेला चित्र राजकीय प्रतिष्ठेत अहंकाराने वागणाऱ्या सेलिब्रिटिंच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. हजारो कुटुंबांच्या पोटाचा विचार करणारे आमदार यांनी अन्नछत्रालयात मिळणारे जेवण घ्यायला सुरूवात केली. अन्नछत्रालयावर जेवण मिळवण्यासाठी आलेल्या मजुर, कष्टकऱ्यांनीही आमदारांच्या साधेपणाला दाद दिली. सामाजिक उपक्रम म्हणजे मदत नाही, तर कर्तव्य आहे. ते बजावताना सर्वसमान्य तळागाळातील नागरिकांमध्ये वावरताना राजकीय पद आणि प्रतिष्ठा बाजुला ठेवून जगणारे आमदार शेळके यांची ‘क्रेझ’दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

उपक्रमांसाठी मदत करण्यांचे मनापासून आभार : आमदार सुनील शेळके

अन्नछत्रालयाबाबत बोलताना आमदार शेळके म्हणाले की, स्थानिक कार्यकर्ते अतिशय योग्य नियोजन करुन सामाजिक बांधिलकी जपत आहेत. लोकसहभागासह सुरु केलेल्या उपक्रमातुन गरजूंना घरपोच जेवण देण्यात येत आहे. या परिसरात औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगार राहत असल्याने त्यांनाही याचा लाभ मिळत आहे. कोरोनाच्या संकटसमयी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दानशुर व्यक्ती, संस्था या अन्नछत्रालयासाठी सहकार्य करीत आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button