breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ७५ हजार ७९९ वर

मुंबई – महाराष्ट्रात रविवारी ९ हजार ४३१ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर ६ हजार ४४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दिवसभरात २६७ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ७५ हजार ७९९ वर गेली असून २ लाख १३ हजार २३८ रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून घरी गेले आहेत. तर कोरोनाबळींचा आकडा १३ हजार ६५६ वर पोहोचला असून सध्या राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात १ हजार ११५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच १ हजार ३६१ रुग्ण कोरोनावर मात करून कोरोनामुक्त झाले. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८० हजार २३८ वर पोहोचली आहे. तर शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ९ हजार ९६ इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा ६ हजार ९० वर गेला आहे. तर मुंबईत सध्या २२ हजार ७६८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून पुणे जिह्यात रविवारी दिवसभरात २ हजार ७७३ नवे कोरोना रुग्ण आढळले. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ८७४ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ६९ हजार ७३८, तर कोरोनाबळींची संख्या १ हजार ६९९ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button