breaking-newsमहाराष्ट्र
काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांना कोरोनाची लागण
अमरावती : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. अनेक नागरिकांसह डॉक्टर, पोलीस, पत्रकार, यांच्यासह मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोना आजारानं ग्रासलं आहे. राज्यात असलेल्या महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशातच पुन्हा एकदा महाविकासआघाडीच्या एका आमदारला कोरोनाची लागण झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून त्यांना अमरावतीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच आमदार बळवंतर वानखेडे यांच्या संपर्कात आलेल्या काही जणांना क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आळं आहे.