breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कामगार संघटनेचा महामंडळासमोर नवा प्रस्ताव

  राज्य परिवहन कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने निर्णय घेऊन नुकतीच 4 हजार 849 कोटी रुपयांचा वेतनकरार करण्यात आला. महामंडळाने देऊ केलेल्या रकमेतच त्यापेक्षाही अधिक वेतन एसटी कमागारांना मिळेल अशी शक्‍यता व्यक्‍त करून तसा स्वरुपाचा सुधारित प्रस्ताव एस. टी कामगार संघटनेने महामंडळास सादर केला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी दिली.

2016-2020 या कालावधीसाठी महामंडळाने कामगारांसाठी जाहीर केलेल्या 4849 कोटी रुपये रकमेचे वाटप मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या सूत्राप्रमाणे करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटनासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एसटी कामगारांना वार्षिक वेतनवाढीचा दर व घरभाडे भत्याचा दर सातव्या वेतन आयोगानुसार देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने या बैठकीत ठरल्यानुसार 2016-2020 या कालावधीसाठी 4849 कोटी रुपये रकमेतच संघटनेने नवीन प्रस्ताव तयार केला असून, तो महामंडळास सादर केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

नव्या प्रस्तावात 31 मार्च 2018 रोजीचे एकूण मासिक मूळ वेतन 87 कोटी रुपये होते. तर, कर्मचारी संख्या एक लाख पाच हजार 679 विचारात घेतलेली आहे. महागाई भत्ता पहिल्या वर्षी 2 टक्‍के, दुसऱ्या वर्षी 5.25 टक्‍के, तिसऱ्या वर्ष 8.50 टक्‍के आणि चौथ्या वर्षी 11.75 टक्‍के गृहीत धरला असून हा सर्व खर्च महामंडळाने देऊ केलेल्या 4849 कोटी रुपयांत बसविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार 2016-2020 या कालावधीचा वेतन करार करावा, अशी मागणी शिंदे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button