breaking-newsआंतरराष्टीय

इम्रान यांना घ्यावा लागणार छोटे पक्ष, अपक्षांचा पाठिंबा

इस्लामाबाद -पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी माजी क्रिकेटपटू इम्रान खान विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना छोटे पक्ष किंवा अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे.

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमतापासून तो काहीसा दूर राहिला आहे. पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या नॅशनल असेंब्लीचे एकूूण संख्याबळ 342 इतके आहे. त्यातील 272 जागा थेट जनतेमधूून निवडून दिल्या जातात. त्यापैकी 261 जागांचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार पीटीआयने 114 जागा पटकावल्या. सध्या तुरूंगात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पक्ष (पीएमएल-एन) 62 जागांसह दुसऱ्या स्थानी राहिला. तर माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांचा पीपीपी (43 जागा) तिसऱ्या स्थानी फेकला गेला. अपक्ष 12 तर छोटे पक्ष उर्वरित जागी विजयी झाले.

नॅशनल असेंब्लीच्या 70 जागा महिला आणि धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत. राजकीय पक्षांना निवडणुकीत मिळालेल्या जागांच्या प्रमाणात राखीव जागा विभागून दिल्या जातात. त्या विचारात घेता सरकार स्थापन करण्यासाठी कुठल्याही पक्षाला 172 जागांचा आकडा गाठणे आवश्‍यक आहे. राखीव जागांच्या वाटपानंतर 342 सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीमधील पीटीआयचे संख्याबळ 160 पर्यंत पोहचेल. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इम्रान यांच्या पक्षाला छोटे पक्ष किंवा अपक्षांचा पाठिंबा गरजेचा आहे. आताच्या निवडणुकीमुळे पाकिस्तानच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा लोकशाही मार्गाने सत्तेचे हस्तांतरण होणार आहे. या निवडणुकीमुळे त्या देशाला इम्रान यांच्या रूपाने नवा पंतप्रधान लाभणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button