breaking-newsक्रिडा

मेसीच्या हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोना अग्रस्थानी

  • ला लीगा फुटबॉल

लिओनेल मेसीच्या हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोनाने सेल्टा व्हिगोचा ४-१ असा सहज पाडाव करत ला लीगा फुटबॉल स्पर्धेत २५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

२३व्या मिनिटाला मेसीने पेनल्टीवर गोल केल्यानंतर फ्री-किकवर दोन गोल करत मेसीने या सामन्यात आपली छाप पाडली. सर्जियो बस्केट्सने ८५व्या मिनिटाला चौथ्या गोलची भर घालत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे बार्सिलोना आणि रेयाल माद्रिदचे समान गुण झाले असले तरी गोलफरकाच्या बळावर बार्सिलोना अव्वल स्थानी पोहोचला आहे.

‘‘मेसीवर प्रत्येक वेळी अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. मेसीसारख्या खेळाडूवर कोणताही संघ अवलंबून राहू शकतो. मेसीने या सामन्यात अप्रतिम खेळ सादर करत आपले कर्तृत्व पुन्हा एकदा दाखवून दिले,’’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक एर्नेस्टो वाल्वेर्डे यांनी सांगितले.

करीम बेंझेमाचे दोन गोल (१७व्या आणि २९व्या मिनिटाला) तसेच त्याला दिलेली सर्जियो रामोस (२०व्या मिनिटाला) आणि फेडेरिको वाल्वेर्डे (६१व्या मिनिटाला) यांनी दिलेली साथ यामुळे रेयाल माद्रिदने आयबरचा ४-० असा धुव्वा उडवला. बेंझेमाचे रेयाल माद्रिदसाठी १५७ गोल झाले आहेत.

दुसऱ्या सामन्यात, रेयाल सोसिएदादला लेगानेसविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करावी लागल्यामुळे अव्वल स्थानी मजल मारण्याची त्यांची संधी हुकली. त्यामुळे सोसिएदादला २३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. मायकेल मेरिनो याने ६३व्या मिनिटाला सोसिएदादला आघाडीवर आणल्यानंतर यूसेफ अन-नेसयरी याने लेगानेससाठी ७८व्या मिनिटाला बरोबरी साधणारा गोल झळकावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button