breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारणार

नागपूर | महाईन्यूज

बुद्धिस्ट सर्किटच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारण्यात येईल. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची ही संकल्पना असून त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. या कॉरिडोरमुळे संशोधक व अभ्यासकांसह पर्यटकांनाही याचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पालकमंत्री म्हणून नितीन राऊ त गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत बोलत होते. पालकमंत्री राऊत म्हणाले, आज भारतीय संविधानाबद्दल देशभरात चर्चा आहे. पर्यायाने भारतीय संविधानाचे शिल्पकार यांच्याबाबतही लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित अनेक स्थळे महाराष्ट्रात आहे. तेव्हा या महामानवाशी संबंधित स्थळांचा विकास करून त्याचा कॉरिडोर तयार केल्यास संशोधक व अभ्यासकांसाठी महत्त्वाचा ठरेल. तसेच यातून पर्यटनाचाही विकास होईल.

आज देशात जे एकूण पर्यटक येतात त्यापैकी ९० टक्के पर्यटक हे बौद्ध स्थळांना भेटी देतात. त्यामुळे नागपुरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्याचीही आपली योजना आहे. ही योजना अतिशय जुनी असली तरी आता ती पूर्ण केली जाईल. यात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती, पॅगोडा, विपश्यना केंद्र अशा सुविधा यात असतील. यामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळेल आणि रोजगार हमी वाढेल. यासाठी फुटाळा तलावाजवळील बायोडायव्हर्सिटीची जागा निश्चित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. झिरो माईलचे सौंदर्यीकरण व यशवंत स्टेडियमच्या जागेवर भव्य वास्तु तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राहुल पांडे यांनी संचालन केले. यावेळी संजय दुबे, राजा करवाडे, अनिल नगरारे, प्रभाकर दुपारे आदी यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button