breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

”सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट”

मुंबई | महाईन्यूज

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून, त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्राही असणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळात मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेली आहे. त्यातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचा फोटो असलेला भगव्या रंगाचा बॅनर ट्विट केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट, असं म्हणत हा राज ठाकरेंचा फोटो असलेला भगव्या रंगातील बॅनर वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यामुळे मनसे खरंच पक्षाच्या झेंड्याचाही रंग अशाच प्रकारे बदलणार का?, याची चर्चा आता सुरू आहे.

तसेच राज ठाकरे आणि भाजपा यांच्यात युती होणार असल्याचंही बोललं जात होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला होता. राज ठाकरेंसोबत बैठक झाली का? याबद्दल बोलताना आमच्यात अनेक वेळा भेटी झालेल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. पण मनसे आणि भाजपा एकत्र येण्याचे आजतरी कुठलीही चिन्हे दिसत नाहीयेत. मनसेच्या आणि आमच्या विचारात अंतर आहे. मनसेचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात आम्ही विचार करू, पण आजतरी ही शक्यता वाटत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी मनसेसोबतच्या आघाडीच्या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिलेलं होतं. तर बाळा नांदगावकरांनीही मनसे भाजपासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे येत्या 23 जानेवारीला राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button