Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशकातील इगतपुरी येथील धक्कादायक प्रकार

नाशिक: नाशिकमधील इगतपुरी येथील मंतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत उलट्याहून दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर इतर चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना इगतपुरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेमुळे इगतपुरीसह जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे. अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काल मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण केल्यावर आज बुधवारी पहाटेच्या सुमारास ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. इगतपुरी शहरात मतिमंद मुलांची शाळा असून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळी शाळेतील निवासी मतिमंद मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना इगतपुरी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button