breaking-newsक्रिडा

रहीमच्या दोन गोलमुळे इंग्लंडची स्पेनवर मात

रहीम स्टर्लिगने केलेल्या दोन गोलमुळे इंग्लंडला स्पेनवर ३-२ अशी मात करता आली. देशाबाहेर खेळतानाचा इंग्लंडचा हा मोठा विजय मानला जात आहे.

स्पेनचे नूतन प्रशिक्षक लुइस एन्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेनचा संघ पूर्ण लयीत खेळत आहे. तर इंग्लंडचा संघ विश्वचषकापासून गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली बहरात खेळत असताना झालेल्या या सामन्याने फुटबॉलरसिकांना पुरेपूर आनंद दिला. पूर्वार्धातच इंग्लंडने तीन गोल लगावत सामन्यावर वर्चस्व मिळवले. त्यानंतर उत्तरार्धात स्पेनकडून पॅको अलकॅसेरने पहिला तर सामना संपण्यास काही क्षण बाकी असताना सर्जिओ रामोसने दुसरा गोल केला. मात्र, तोपर्यंत इंग्लंडचा विजय निश्चित झालेला होता.

त्यामुळे युएफा नेशन्स लीगमध्ये इंग्लंड त्यांच्या गटात सर्वोच्च स्थानी राहण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांना विश्वचषकानंतरही संघ चांगली कामगिरी करण्याबाबत विश्वास वाटू लागला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button