breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

टेस्लाची भारतात एन्ट्री, कर्नाटकला पसंती दिल्याने मनसेची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतीय बाजारात उतरण्यास तयार आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे. बंगळुरुतील एका रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटसह कंपनी आपल्या कामाला सुरुवात करणार आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या टीमसोबत 22 ऑक्टोबर 2020 रोजी प्राथमिक चर्चाही केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली होती. परंतु टेस्लाने महाराष्ट्रऐवजी कर्नाटकला पसंती देत बंगळुरुमध्ये नोंदणी केली. त्यानंतर “टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका. बोलाची कढी बोलाचा भात,” अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी टेस्लाचं स्वागत केलं आहे. टेस्लाची 8 जानेवारी 2021 रोजी बंगळुरुमध्ये नोंदणी झाली आहे. याचा नोंदणी क्रमांक 142975 आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेविड जॉन फेन्स्टीन कंपनीचे संचालक आहेत. वैभव तनेजा टेस्लामध्ये CFO आहेत, तर फेन्स्टीन टेस्लामध्ये ग्लोबल सीनियर डायरेक्टर, ट्रेड मार्केट अॅक्सेस आहेत. कंपनी भारतात मॉडल 3 लॉन्च करण्याची शक्यता आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस डिलिव्हरीला सुरुवात होऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button