breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

हिंगणघाट हत्याकांड : आरोपी विकेश नगराळे विरोधात चार्जशीट दाखल : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

हिंगणघाट येथील जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.आज न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले असून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळण्याच्या दृष्टीने सरकार पाठपुरावा करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

हिंगणघाटमधील तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही तरुणी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. एकतर्फी प्रेमातून या तरुणीला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. प्राध्यापक असलेली ही तरुणी खेड्यावरून हिंगणघाटला जाणं-येणं करत असे. सकाळी ती डबा घेऊन निघाली होती. हिंगणघाटमधल्या त्या चौकात जेव्हा ती आली त्यावेळी आरोपी विकेश नगराळे हा दडून बसला होता. त्याच्या एका हातात टेंभा होता आणि दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली. तिला पाहताच त्याने एका हाताने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि दुसऱ्या हाताने टेंभ्याने आग लावली. यानंतर ती जळत होती. मात्र, पीडित शिक्षिका जळत असताना काही लोकांना पाझरं फुटलं आणि लोकांनी आग विझवली. तोपर्यंत शिक्षिका 40 टक्के भाजली होती.. यानंतर मात्र तरुणी जमिनीवर कोसळली आणि सुन्न पडून होती. तातडीने काहीजणांनी तिला रुग्णालयात दाखल केले व उपचार सुरू केले. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. याआधाही आरोपी विकेशने तिला त्रास दिला होता. त्यावेळी पीडित तरुणीच्या पालकांनी त्याला समज दिली होती. पीडितेला पुढील उपचारासाठी नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. येथे तिच्यावर उपचार सुरू होते. तिचा चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला होता. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button