breaking-newsराष्ट्रिय

रमजानच्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये घातपाताची शक्यता

श्रीनगर : रमझानच्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये घातपात होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे सीमेवरील सुरक्षा रक्षकांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. पाकिस्तानात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत परतलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. तसेच हा तरुण देशात घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

सध्या रमजानचा महिना सुरु होत असून अमरनाथ यात्राही सुरु आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ, लष्कर, बीएसएफ तसेच जम्मू-काश्मीर पोलिसांना सतर्कतेचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यासह देशभरात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. एका वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button