breaking-newsराष्ट्रिय

21 राज्यांवर एनडीएचा झेंडा

बंगळूरू : कर्नाटक विधानसभेचा निकाल आज जाहीर होणार आहे. कर्नाटकात होत असलेली विधानसभा निवडणूक २०१९च्या लोकसभा निवडणुकीची क्वार्टर फायनल मानली जात आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात सहा दिवसात २१ सभा घेतल्या, तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या २७ सभा आणि रॅली झाल्या.

कर्नाटकात भाजप २००८ ते २०१३ या काळात सत्तेत होती. दक्षिण भारतात पहिल्यांदाच कमळ फुलवणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. भाजपने कर्नाटकात विजय मिळवल्यास २०१९चा मार्ग सुकर होईल. शिवाय या विजयासोबतच २१ राज्यांमध्ये भाजपप्रणित एनडीएचे सरकार असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button