breaking-newsपिंपरी / चिंचवड

मावळचे शिवसेना माजी खासदार गजानन बाबर पुन्हा शिवबंधनात

पुणे – शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. कारण, मावळमधून शिवसेनेचे पहिले खासदार गजानन बाबर पुन्हा स्वगृही परतले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. भगवा ध्वज आणि उपरणे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

2014 मध्ये तिकीट नाकारल्यानंतर बाबर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बाबर यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत असताना बाबर यांनी सलग तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि एकदा खासदारकी भूषवली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीला म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुलासाठी अजित पवार सध्या मावळमध्ये तळ ठोकून आहेत. तर शिवसेनेनेही पूर्ण ताकद पणाला लावली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button