breaking-newsताज्या घडामोडीपुणे

या बँकेकडून पुणे मेट्रोसाठी २०० दशलक्ष युरोचा पहिला हप्ता मिळणार

पुणे | पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक ६०० दशलक्ष युरोचा (सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपये) वित्त पुरवठा करणार असून त्याच्या पहिला हप्ता २०० दशलक्ष युरो ( सुमारे १ हजार ६०० कोटी रुपये ) देण्यासंदर्भात पुणे मेट्रो आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करार झाला. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या सहकार्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला चालना मिळणार असून भविष्यात इतरही प्रकल्पांना युरोपियन बँकेने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व बँकेचे उपाध्यक्ष अँड्र्यू मॅकडोवेल यांनी करारावर स्वाक्षरी केली. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने पुणे मेट्रो प्रकल्पाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बँकेने केलेल्या या सहकार्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळणार असून पुणे मेट्रो लवकर कार्यान्वित होण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे पुणे व आसपासच्या परिसरातील वाहतुकीत प्रभावीपणे सुधारणा होईल. पुण्याच्या विकासास हातभार लागेल. पुणे मेट्रोची भौतिक प्रगती सध्या ३७ टक्के तर आर्थिक प्रगती २९.५३% झाली आहे. बँकेने दिलेल्या निधीचा वापर मेट्रोच्या भुयारी मार्ग, डेपो कामांसह इतर कामांसाठी केला जाईल.

युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेची महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुंतवणूक विकास आशादायक आहे. पुणे मेट्रोबरोबरच नाशिक मेट्रोसाठी व पर्यावरण संवर्धनाच्या प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button