breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या शिक्षकांना आता 7 व्या वेतन आयोगाचा लाभ, आयुक्त काढणार आदेश

  • भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची मध्यस्ती
  • महापालिकेत बैठक घेऊन आयुक्तांना केली सूचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. सातवा वेतन आयोगानुसार शिक्षकांना लाभ देण्यासंदर्भातील आदेश काढण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला. भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मध्यस्थितीने हा प्रश्न मार्गी लागला आहे.

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागावर सोमवारी (दि. 2) धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यासाठीच्या लढ्याला आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी पाठिंबा दिला होता. मागण्यांसाठी आमदार महेश लांडगे यांनी आज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत बैठक घेतली. शिक्षकांच्या मागण्या मान्य न करण्याची कारणे त्यांनी विचारली. त्यावर शिक्षण विभागाकडून पाठपुरावा कमी पडल्यामुळेच मागण्या मान्य करण्यासाठी विलंब लागल्याचा निष्कर्ष समोर आला. त्यावर शिक्षकांच्या मागण्या त्वरीत मान्य करून त्यांना सातवा वेतन आयोग असेल अथवा बीएलओच्या कामातून मुक्तता असेल यासंबंधीत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना आमदार लांडगे यांनी आयुक्त हर्डीकर यांना केली.

आयुक्त हर्डीकर यांनी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना तातडीने पत्रव्यवहार करून सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दिले. उद्या आयुक्तांचा रितसर आदेश काढला जाणार असून तो शाळेतील शिक्षकांना लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उर्दू व हिंदी माध्यम शिक्षकांचे रोष्टर पूर्ण करून पदोन्नती पात्र शिक्षकांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करावी. शिक्षकांची पदे भरणे, मराठी माध्यम शाळेतील शिक्षकांची पदे भरणे, पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या रिक्त जागी प्रभारी न करता नियमानुसार कराव्यात, 16 नंबर फॉर्म शिक्षण विभागातून मिळावा, आयकर रक्कमेचे धनादेश एकाच धनादेशाद्वारे करावेत, धन्वंतरी योजनेची अंमलबजावनी करावी, अशा अनेक मागण्या आज बैठकीत मांडण्यात आल्या. त्यावर सांगोपांग विचार करून मागण्या तातडीने सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिले.

मनपा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश फेब्रुवारी 2019 मध्ये काढला. शासनाचे आदेश असताना हा निर्णय लागू करण्यास स्थानिक पातळीवर विलंब होत गेला. अखेर आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थिने हा प्रश्न मार्गी लागला आहे. आयुक्तांनी तत्संबंधीत आदेश काढण्याचे मान्य केले आहे.

मनोज मराठे, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button