breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

CORONA Virus : ‘ते’ ३२४ भारतीय परतले!

नवी दिल्ली | जगाला हादरवून सोडणाऱ्या करोना विषाणूचं मूळ असलेल्या चीनमधील वुहानमधून आज ३२४ भारतीय दिल्लीत दाखल झाले. सकाळी साडेसातच्या सुमारास एअर इंडियाचं विशेष विमान त्यांना घेऊन दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झाले आहे.

विमानातील सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यांच्या आरोग्याविषयी खातरजमा करूनच त्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.

चीनमधील वुहानमध्ये ‘करोना’ विषाणूंचा उद्रेक झाला आहे. या विषाणूचा इतरत्रही संसर्ग झाल्याची भीती आहे. त्यामुळं चीनमध्ये घबराट पसरली असताना तिथं अडकून पडलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ‘एअर इंडिया’ने पुढाकार घेतला. त्यासाठी ‘डबल डेकर’ श्रेणीतील मोठे विमान सकाळीच मुंबईहून दिल्लीला रवाना करण्यात आले. दिल्लीहून हे विमान दुपारी वुहानला रवाना झाले.

भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे विमान वुहानमध्ये पोहोचले होते. ते सकाळी परतले. डॉक्टरांचं एक पथक विमानतळावर तैनात असून ते प्रवाशांची तपासणी करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button