breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: भारतातील पहिल्या कोरोनामुक्त राज्यात सापडले ७ रुग्ण

देशातील पहिले करोनामुक्त राज्य ठरलेल्या गोव्यात पुन्हा एकदा करोना व्हायरसने शिरकाव केला आहे. बुधवारी गोव्यात रॅपिड पीसीआर टेस्टदरम्यान सात नवे रूग्ण आढळले आहेत. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसंच त्याचे नमुने गोवा मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. सर्व रूग्ण महाराष्ट्र आणि गुजरातमधून आलेले आहेत. आंतरराज्य वाहतूक सुरू झाल्याने पुन्हा एकदा रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे.

गोव्यात ३ एप्रिल रोजी शेवटचा करोनाचा रूग्ण आढळला होता. त्या रूग्णानं करोनावर मात केल्यानंतर १९ एप्रिल रोजी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा हे राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. मात्र आज पुन्हा ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोवा राज्यात कोरोनाचे सात रुग्ण आढळले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button