breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात विविध ठिकाणी योगा प्रात्यक्षिकांमध्ये महापौरांनी घेतला सहभाग

पिंपरी, (महाईन्यूज) – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महापौर राहूल जाधव यांनी शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. शिवाजीनगर, जाधववाडी, संत सावतामाळी उद्यान आदी ठिकाणी योगा प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन योगा दिन साजरा करण्यात आला.

महापौरांनी संत सावतामाळी उद्यान, शिवाजीनगर से.१६, जाधववाडी, चिखली याठिकाणी प्रत्यक्ष योगामध्ये भाग घेतला. आज सकाळी सहा वाजता महापौरांनी योग शिबीरास उपस्थीती लावून योगाभ्यास केला. तसेच, शहरामध्ये रामस्मृती मंगल कार्यालय भोसरी, संत तुकाराम क्रिडा संकुल, इंद्रायणी नगर भोसरी, डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय संत तुकारामनगर याठिकाणी भेटी दिल्या. महापौरांसोबत शहरातील नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button