breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई: लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

मुंबई:– मुंबई लोकलच्या गर्दीने आणखी एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. भरगच्च लोकलमधून पडल्याने एका 22 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. चार्मी पासद असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी 9 च्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे.

चार्मी पासदने डोंबिवलीवरुन सकाळी 8.53 ची लोकल पकडलेली होती. मात्र गर्दीमुळे आत जाता न आल्यामुळे, ती बाहेरच लटकून राहिली होती. ट्रेन डोंबवलीच्या पुढे गेल्यानंतर, डोंबिवली आणि कोपर रेल्वेस्थानकादरम्यान, चार्मीचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. या दुर्घटनेमध्ये तिचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button