breaking-newsक्रिडा

यंदाच्या आयपीएलचं टायटल स्पॉन्सर ड्रीम इलेव्हनकडे

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या 13व्या सीझनसाठी नवा टायटल स्पॉन्सर ची घोषणा करण्यात आली आहे. ड्रिम इलेव्हन यंदाच्या सीझनचं टायटल स्पॉन्सर असणार आहे. VIVO ला 13व्या हंगामाच्या टायटल स्पॉन्सवरून हटवल्यानंतर Dream 11 यंदा आयपीएलचं टायटल स्पॉन्सर असणार आहे.

आयपीएलचे प्रमुख आयोजक बनण्याच्या शर्यतीत अनअॅकॅडमी, टाटा आणि बायजूस हेदेखील होते. अनअॅकॅडमीने 210 कोटी, टाटाने 180 कोटी आणि बायजूसने 125 कोटींची बोली लावली होती. ड्रीम इलेव्हनने 250 कोटींची बोली लावून आयपीएलचं टायटल स्पॉन्सर आपल्या नावे केलं आहे.

आधी आयपीएलचं टायटल स्पॉन्सर VIVO कडे होतं. परंतु, भारत आणि चीनमध्ये वाढत्या तणावामुळे BCCI ने विवोकडून सर्व अधिकार काढून घेतले होते. विवोने 2018 ते 2022 पर्यंत म्हणजेच, पाच वर्षांसाठी 2190 कोटी रुपये बीसीसीआयला देत आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले होते.

दरम्यान, यावेळी बीसीसीआय समोर टायटल स्पॉन्सर सोधण्याचं आव्हान उभं ठाकलं होतं. बीसीसीआयने भारत आणि चीनमध्ये झालेल्या तणावानंतर वीवोला टायटल स्पॉन्सर म्हणून हटवण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयला वीवो दरवर्षी टायटल स्पॉन्सर म्हणून 440 कोटी रुपये देत होतं. वीवोने बीसीसीआयसोबत 2022 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button