breaking-newsराष्ट्रिय

मध्य प्रदेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये केवळ भूमिपुत्रांनाच स्थान : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

भोपाळ : मध्य प्रदेशात आता केवळ भूमिपुत्रांनाच सरकारी नोकरींमध्ये स्थान मिळणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज (18 ऑगस्ट) ही घोषणा केली. केवळ मध्य प्रदेशातील तरुणांनाच सरकारी नोकरी मिळावी, यासाठी कायदेशीर पावलं उचलली जातील असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. शिवराज सिंह चौहान यांनी एक व्हिडीओ जारी करुन याची माहिती दिली. ते म्हणाले की, “यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील. मध्य प्रदेशातील साधनसामुग्री केवळ राज्यातील मुलांसाठीच असतील.”

आतापर्यंत मध्य प्रदेशासाठी सरकारी नोकरभरतीसाठी संपूर्ण देशातून अर्ज मागवले जात होते. देशभरातून कोणीही नोकरीसाठी अर्ज करु शकत होतं. नुकतंच एका नोकरभरतीसाठी संपूर्ण देशभरातून अर्ज मागवले होते. यावरुन मध्य प्रदेशातील तरुणांनी याचा जोरदार विरोध केला होता.

याआधी कमलनाथ सरकारने उद्योगांमध्ये 70 टक्के रोजगार स्थानिकांना देणं अनिवार्य केलं होतं. कमलनाथ सरकारच्या नियमानुसार, मध्य प्रदेशातील 70 टक्के स्थानिकांना रोजगार दिला तरच सरकारी योजनांमध्ये उद्योजकांना करामध्ये सूट मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button