breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभारी क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडेवर आयुक्तांची दंडात्मक कारवाई

– क प्रभागात स्वच्छतेविषयक कामात हलगर्जीपणा भोवला

– सर्वत्र अस्वच्छता, दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची शक्यतेचा ठपका

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रभारी क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, सहायक आरोग्यधिकारी बाबासाहेब कांबळे यांच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र अस्वच्छता, दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावर आयुक्तांनी अचानक परिसराची तपासणी केली असता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहिला होता.त्यामुळे आयुक्तांनी दोन्ही अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून प्रत्येक दोनशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश दिला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरात आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होवू नये, म्हणून स्वच्छता व आरोग्य विषयक कामे करण्यात येतात. सर्व परिसराची स्वच्छता व संबंधित आरोग्यविषयक बाबीवर नियंत्रण ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिका-यांची असते. यावर आयुक्तांनी क प्रभागाची 23 आक्टोबर 2018 रोजी स्वच्छतेविषयक बाबीचा तपासणी केली. बहुतेक सर्व परिसरात ठिकठिकाणी कचरा साचून दुर्गंधी पसरलेली आढळून आलेली आहे. त्यामुळे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे व सहायक आरोग्यधिकारी बाबासाहेब कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला होता.

दोन्ही अधिका-यांनी आयुक्तांना सादर केलेला खुलासे समाधानकारक वाटले नाहीत. साफसफाई कामकाजात गांभिर्याने लक्ष न घातला व जबाबदारीपुर्वक कामकाज करुन घेत नसल्याचेही निदर्शनास आले. दोन्ही अधिका-यांनी कर्तव्यात कसुर करुन महाराष्ट्र नागरी सेवा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे.  त्यामुळे क प्रभागाचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, सहायक आरोग्यधिकारी बाबासाहेब कांबळे यांनी कामकाजात केलेला हलगर्जीपणा व स्वच्छतेविषयक साफसफाईचे कामे करुन घेण्यास बेफीकिरी, अनास्था दाखविल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही अधिका-यांना प्रत्येक दोनशे रुपये शास्ती आकारण्यात येत असून त्याच्या वेतनातून कपात करण्यात येणार आहे. तसेच सदरील आदेशाची नोंद संबंधिताच्या सेवा नोंद पुस्तकांत घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button