breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

म्हाडाच्या अध्यक्षपदी उदय सामंत…

  • महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्‍त्या जाहीर 

मुंबई – विविध विकास महामंडळे व प्राधिकरणावरील नियुक्‍त्यावरून शिवसेना व भाजपामध्ये सुरु असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. आगामी निवडणूकीच्या पाश्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपापल्या पक्षातील आजी-माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांचे पुनर्वसन करीत त्यांची महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या पदांवर नियुक्‍त्या केल्या.

शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी, तर मुंबई म्हाडाच्या सभापतीपदी भाजपाचे माजी आमदार मधू चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सभापतीपदी विनोद घोसाळकर आणि सिडकोच्या अध्यक्षपदी भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची वर्णी लागली आहे.

सिडको आणि मुंबई म्हाडाच्या अध्यक्षपदावरून सेना-भाजपमध्ये रस्सीखेच होती. मात्र, भाजपने ही दोन्ही मंडळे आपल्या ताब्यात ठेवली आहेत. भाजपने राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करून राष्ट्रवादीला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेनेने महामंडळावर माजी आमदार विनोद घोसाळकर, आशिष जयस्वाल यांना संधी दिली आहे.

राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत. जाहीर केलेल्या नियुक्‍त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button