breaking-newsमुंबई
कुलाब्यातील प्रतिष्ठित शाळेतून पाच मुली बेपत्ता
मुंबईतील कुलाबा भागात असलेल्या फोर्ट कॉनव्हेंट स्कूल या प्रतिष्ठित शाळेतून पाच मुली बेपत्ता झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास या मुलींची शाळा सुटली. काल या शाळेचे ओपन हाऊस होते. या पाचही मुली आठवीत शिकणाऱ्या आहेत. या मुलींबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने या मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्या कुठे गेल्या त्यांचे काय झाले? हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी या मुलींचा शोध सुरू केला आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या मुलींचे पालक शाळेत होते. तसेच इतरही अनेक पालक या शाळेत जमले होते. आता या पाच मुलींचे नेमके काय झाले? त्या कुठे गेल्या? हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे असेही समजते आहे.