breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

सुर्यमुखी दत्त मंदिरस दिलेली नोटीस कायदेशीर नाही; मिलिंद एकबोटे

बांधकाम व्यासायिकांसाठी रचलेला डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही

शिवाजीनगर : रस्ता रुंदीकरणासाठी नोटीस हे निम्मित मात्र असुन बांधकाम व्यासायिकांसाठी सोयीचा असलेला हा डाव आहे. वर्ष २००९ पूर्वीचे बांधले गेलेले मंदिरे अनधिकृत नाही असा न्यायालयाचा निर्णय आहे. सुर्यमुखी दत्त मंदिर हे ४० वर्षा पूर्वीचे असून या मंदिराचा कारभार हा दत्त भक्तांच्या सामुदाईक जबाबदारीने होत असतो. या मंदिरास दिलेले अतिक्रमण विभागाचे पत्र हे कायदेशीर नाही असे मत समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी व्यक्त केले.

पुणे शिवाजीनगर, गणेशखिंड रोड, शिरोळे चाळ येथील गेल्या साधरण चार दशके पूर्वीचे श्री सूर्यमुखी दत्त मंदिर हजारो दत्त भक्ताचे श्राद्धाचे स्थान आहे. याच प्राचीन जागृत व भाविकांचे श्रद्धास्तान असलेले श्री दत्त मंदिर मंदिराला पुणे मनपा अतिक्रमण वभागाने नोटीस बजावण्यात आली असून या नोटीस मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी सदर मंदिर स्वखर्चाने चित्तरंजन वाटिका बागेमध्ये स्थलांतरित येत्या सात दिवसात करावे असे सांगितले आहे. या नोटिसचा विरोध दर्शिण्यासाठी गोविंददेव गिरि अध्याक्ष असलेल्या श्रीकृष्ण सेवा निधी तसेच समस्त हिंदू आघाडी चे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचे पत्र आयुक्तांना दिले आहे.

या सोबतच सदर नोटीस विरोधात दत्त भक्त बंडू बाजारे, मिलिंद एकबोटे, दत्ता खाडे, रविंद्र साळेगावकर, संदीप काळे, दीपक कदम, पुरुषोत्तम बाजारे, निरंजन ढोक, प्रमोद भोसले, अक्षय पायगुडे, दत्ता खामकर, शेखर भुजबळ, अक्षदा धुमाळ, शिल्पा मारणे, मोहन निंबाळकर, नंदकुमार मंडोरा, युनूस बागवान, शेखरआण्णा पाटील, चंदा पयगुडे, सुनीता पठेर आदी पदधिकारी तसेच शिवाजीनगर भागातील दत्त भक्त एकत्र येऊन बैठक घेऊन माहिती घेतली व संबधीत अधिकारी वर्गासोबत फोन करून संपर्क साधला असता येत्या सोमवारी या विषयावर चर्चा करू असे सांगण्यात आले. तसेच येत्या गुरुवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सर्व धर्मीय तसेच सर्व पक्षीय व दत्त भक्तांच्या वतीने महाआरती करण्यात येईल असे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button