breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांची १८ कोटींची संपत्ती

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे ४ कोटी ४६ लाख ३६ हजार ४९४ रुपयांची  तर त्यांच्या पत्नीकडे १ कोटी ८९ लाख ६३ हजार ११५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. संजोग वाघेरे यांच्याकडे ६ कोटी ८५ लाख रुपयांची  तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांच्याकडे ५ कोटी २० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.वाघेरे कुटुंबियांकडे स्थावर आणि जंगम अशी एकूण १८ कोटी ४४ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

हेही वाचा – ‘माझ्या आईनं देशासाठी मंगळसुत्र कुर्बान केलंय’; प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

तसेच,संजोग वाघेरे यांच्याकडे ३५१ ग्रॅम वजनाचे २१ लाख ७६ हजार ५७१ रुपयांचे दागिने आहेत.त्यांच्याकडे एक लाख ५४ हजार रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे पावणे दोन लाख रुपयांची रोख रक्कम आहे. दरम्यान,वाघेरे यांच्यावर ६४ लाख ४८ हजार २७१ रुपयांचे तर  त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांच्यावर २ कोटी ३३ लाख ८४ हजार रुपयांचे कर्ज आहे.

संजोग वाघेरे यांच्यावर आंदोलनाचे तीन गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे ५० हजार ४९० रुपयांचे विदेशी बनावटीचे पिस्तूल देखील आहे. वाघेरे यांच्याकडे वाकड आणि पिंपरी येथे अनुक्रमे एक आणि चार अशा पाच निवासी मालमत्ता आहेत. वाघेरे पती-पत्नींनी आपले उत्पन्नाचे साधन व्यवसाय दाखविला आहे.संजोग वाघेरे यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. मात्र त्यांनी त्यांचे चिरंजीव ऋषिकेश वाघेरे यांना एक कोटी २४ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. तर, पत्नीला ९७ लाख रुपये उसने दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button