Uncategorized

मोदींशी लढेल, पण त्यांचा द्वेष करणार नाही: राहुल

भुवनेश्वर | मी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढेल. मात्र, त्यांचा द्वेष करणार नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीयांनी शुक्रवारी सांगितले. ‘माझ्याशी ते (मोदी) असहमत आहेत आणि मी त्यांच्याशी असहमत आहे, याची मला कल्पना आहे. मी त्यांच्याशी लढेल. ते पंतप्रधान होऊ नयेत यासाठी प्रयत्न करेन. मात्र, त्यांचा द्वेष करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधी यांचा राजकारणात झालेला प्रवेश अचानक झालेला नाही. आपली मुले मोठी झाल्यावरच राजकारणार सक्रिय होण्याचे प्रियंका गांधी यांनी ठरवले होते, असे स्पष्टीकरणही राहुल गांधी यांनी दिले. भुवनेश्वर येथील ‘द ओडिसा डायलॉग’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘मी मोदींकडे पाहतो आणि जेव्हा ते माझ्याबद्दल अपशब्द वापरतात तेव्हा मी त्यांना मिठी मारतो आहे, असे मला वाटते,’ असे राहुल गांधी म्हणाले. ‘काँग्रेस पक्षामुळे ते अस्वस्थ आहेत. मला त्याची कल्पना आहे. मात्र, मला त्यांचा राग येत नाही. हीच आमची घडण आहे. आम्ही लोकांचा द्वेष करत नाही,’ असेही राहुल यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा वैचारिक पालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेले अपशब्द हे मी सर्वांत मोठी भेटवस्तू समजतो, असा टोलाही राहुल यांनी लगावला.
‘आरएसएस’वर टीका 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोदी सरकारमधील मंत्र्यांवर नियंत्रण आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशातील सर्व संस्थांवर कब्जा करायचा आहे, असेही राहुल म्हणाले. भाजपप्रणित एनडीए सरकारमध्ये सगळीकडे संघाची छाप आहे. सध्या त्यांच्याकडे एकच संस्था आहे. ती म्हणजे भाजपची मातृसंस्था आरएसएस. त्यांना वाटते देशात ही एकच संस्था आहे. त्यांना सर्व संस्थांवर नियंत्रण मिळवायचे आहे,’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button