breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडी

“Pfizer ची कोरोना लस घेतली तर लोक मगर होतील, स्त्रियांना दाढी येईल”, ‘या’ राष्ट्राध्यक्षांचा अजब दावा

जागतिक महामारी कोरोनामुळे जगभर रुग्णांच्या संख्येने तब्बल सात कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून यावर लस शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. काही ठिकाणी कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात झाली असून त्याचे साईड इफेक्ट समोर येत आहेत.

यातच ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचे अजब वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये सध्या चांगलेच पसरले आहे. Pfizer ची कोरोना लस घेतली तर स्त्रियांना दाढी येईल असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकन कंपनी फायझरने कोरोनावर लस विकसित केली आहे. मात्र ही लस घेतली तर लोक मगर होतील आणि महिलांना दाढी येईल अशी शंका राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

Women wiil get beard if they take Pfizer vaccine

बोल्सोनारो हे कोरोना व्हायरसची तीव्रता आधीपासूनच नाकारत आले आहेत. या आठवड्यात त्यांनी देशात लसीकरण सुरू झालं तरी आपण ही लस घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे. बोल्सोनारो यांनी फायझरबरोबरच्या करारामध्ये हे स्पष्ट झालं आहे की, आम्ही (कंपनी) कोणत्याही दुष्परिणामांसाठी जबाबदार नाही. जर आपलं रुप बदलून तुम्ही मगर झालात तर ही आपली समस्या असल्याचं म्हटलं आहे.

ब्राझीलमध्ये कित्येक आठवड्यांपासून कोरोना लसीची चाचणी सुरू आहे आणि लोकांना ब्रिटन आणि अमेरिकेमध्येही लस दिली जात आहे. ते पुढे म्हणाले, ही लस घेतल्यानंतर जर तुम्ही सुपरह्युमन झाला, स्त्रियांना दाढी आली किंवा पुरुष स्त्रियांच्या आवाजात बोलू लागले तर ते त्याची जबाबदारी घेणार नाही असं म्हटलं आहे.

वाचाः तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात

देशात लसीकरण कॅम्पेनची सुरुवात करीत बोल्सोनारो यांनी सांगितलं की, लस मोफत असेल मात्र अनिवार्य नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की, लस घेणं गरजेचं आहे, मात्र लोकांना लस अनिवार्य करू शकत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्रिटननंतर आता अमेरिकेतही कोरोनाच्या लसीमुळे दोन आरोग्य कर्मचारी आजारी पडल्यामुळे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. युएस सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल आणि प्रिवेंशनने संपूर्ण प्रकरणाची खोलवर तपासणी केली जात आहे. सीडीसीने धोक्याची सुचना देत सांगितले की, कोरोना व्हायरसची लस दिल्यानंतर ज्या व्यक्तीमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसून आली त्यांना दुसरा डोस दिला जाणार नाही.

अमेरिकेतील खाद्य आणि औषध प्रशासनाकडून या एलर्जीच्या प्रकारांवर परिक्षण केलं जात आहे. फायझर-बायोएनटेक कोरोनाची लस दिल्यानंतर अशा प्रकारचे परिणाम दिसून आले होते. अलास्कामध्ये फायझरची कोरोनाची लस दिल्यानंतर दोन आरोग्य कर्मचारी आजारी पडले. त्याच्यावर लसीचे गंभीर एलर्जीक परिणाम झाले. लस दिल्यानंतर केवळ 10 मिनिटानंतर आरोग्य सेवकास एलर्जी झाली. अ‍ॅनाफिलेक्टिक लक्षणे अशा लोकांमध्ये आढळून आली आहेत.

वाचाः इस्त्रायलमध्येही कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात, पंतप्रधानांनी टोचून घेतली लस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button