breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विमानतळावर चहा, कॉफी, पाणी १० रुपयांत

पुणे | लोहगाव विमानतळावर ‘लो-कॉस्ट स्टॉल’ या उपक्रमांतर्गत विक्री करण्यात येणारा चहा, कॉफी आणि पाणी बॉटल आणखी स्वस्त झाले आहेत. विमानतळावर शुक्रवारी सुरू झालेल्या नवीन स्टॉलवर या सर्व वस्तुंसाठी प्रत्येकी १० रुपये आकारण्यात येणार आहेत. विमानतळ टर्मिनलमधील खाद्यपदार्थ विक्री काउंटरवर खाद्यपदार्थांचे दर बाजारातील सामान्य दरांपेक्षा अधिक आकारले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून सातत्याने केल्या जातात. पाण्याच्या अर्धा लिटरच्या बाटलीसाठी ४६ रुपये, चहा ४० ते ४५ रुपये, कॉफीला शंभरच्या घरात, सँडविच दोनशे रुपये अशी दरआकारणी करून प्रवाशांची अक्षरश: लूट केली जाते. यावर माध्यमांकडून सातत्याने आवाज उठविण्यात आला. त्यानंतर विमानतळ प्रशासनाने रास्त दरातील खाद्यपदार्थ विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी रास्त दरातील पहिले केंद्र सुरू झाले. त्या केंद्रावर पाणी १० रुपये, चहा १५ रुपये आणि कॉफी २५ रुपये दराने विक्री केली जाते. त्या तुलनेत आता सुरू झालेल्या स्टॉलवर या सर्वांसाठी १० रुपये द्यावे लागणार आहेत, अशी माहिती विमानतळ संचालक अजय कुमार यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button