breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबई मनपा वॉर्ड रचना: शिंदे-फडणवीस सरकारला झटका, उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा

  • वॉर्ड पुनर्रचनेवरुन शिंदे-भाजप सरकारला झटका
  • वॉर्ड फेरबदलाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
  • मुंबईत २३६ वॉर्डनुसारच निवडणुका होणार
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवरुन शिंदे-भाजप सरकारला सर्वोच्च न्यायालायाने झटका दिला आहे. मुंबईतील वॉर्ड फेरबदलाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुंबईत २२७ वॉर्डनुसार निवडणूक घेण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने उद्धव ठाकरेंना दिलासा मिळाला आहे. कारण, ठाकरे सरकारचा २३६ वॉर्डचा निर्णय शिंदे-भाजपचं सरकार येताच बदलण्यात आला होता. मात्र, आता शिंदे सरकारच्या या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे (Supreme Court on BMC Election 2022).

शिंदे-भाजप सरकात अस्तित्वात येताच २०१७ मध्ये ज्या २२७ वॉर्डनुसार निवडणुका झाल्या होत्या. त्याच पद्धतीने निवडणुका घेण्याचा अध्यादेश शिंदे सरकारने काढला होता. तर यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने या वॉर्ड पुर्रचनेसंदर्भात निर्णय घेत २३६ वॉर्ड पाडत निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. सरकार येताच हा निर्णय बदलण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेवर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरेंना दिलासा देत या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

शिंदे सरकारनं रद्द केला होता निर्णय 

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईतील वॉर्डरचना नऊने वाढवून ती 227 वरुन 236 वर नेली होती. त्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला होता. वाढवलेले नऊ वॉर्ड हे शिवसेनेच्या फायद्यासाठी असल्याचा आरोपही भाजपने त्यावेळी केला होता. शिंदे सरकारने हे वाढवलेले नऊ वॉर्ड रद्द केले होते. मविआ सरकारने वाढविलेले वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याने हे वॉर्ड रद्द करण्यात आल्याची माहिती देत शिंदे सरकारनं निर्णय घेतला होता. त्यामुळे नवीन वॉर्ड रचना रद्द करुन ती 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती त्या प्रमाणे कायम ठेवली होती. या निर्णयाला शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.

या प्रारूप आराखड्यानुसार मुंबईत महापालिकेत एकूण  236 वॉर्ड असतील

आरक्षण

खुला प्रवर्ग – 219
एससी -15
एसटी – 2

महिला जागा

एकूण
खुला प्रवर्ग – 118
एससी – 8
एसटी – 1

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button