breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या संतती नियमन शस्त्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार

  • माजी नगरसेवक मारुती भापकर यांचा आरोप
  • चौकशी करण्याची आयुक्तांकडे केली मागणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चार वर्षात मोकाट व भटक्या कुत्र्यांवर संतती नियमन शस्त्रक्रिया करण्यासाठी ४ कोटी ३ लाख ३६ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. यात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट व भटक्या कुत्र्यांचा व डुकरांचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागत आहे. महिला, बालक  व रात्रीच्या वेळी पादचा-यांवर, दुचाकी स्वा-यांवर कुत्र्यांकडून हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांमध्ये नागरिक जखमी होत आहे. याबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने शहरातील मोकाट व भटकी कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. कुत्री पकडून नेहरुनगर येथील गुलाबपुष्प उद्यानाशेजारच्या डॉग शेल्टरमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर ही कुत्री ज्या ठिकाणावरून आणली, त्याठिकाणी पुन्हा सोडली जातात. एका कुत्रांसाठी ६९३ रुपये खर्च येतो.

सन २०१५ ते १६ मध्ये एकूण १५ हजार ८०८ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली गेली. त्यासाठी एकूण १ कोटी ९ लाख ५५ हजार ५२३ रुपये खर्च झाला. सन २०१६-१७ या वर्षात १४ हजार ९०७ मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली गेली. त्याकरिता पालिकेने १ कोटी ३ लाख ३० हजार ९१६ रुपये खर्च केले. २०१८-१९ मध्ये आजअखेर १५ हजार १६० मोकाट कुत्री पकडली. त्यापैकी १४ हजार १६० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली गेली. एकूण २५३ जखमी, आजारी व पूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया न करता सोडून देण्यात आले. त्यासाठी आतापर्यंत एकूण १ कोटी ३ लाख ३० हजार ५५७ इतका खर्च झाला आहे. असा गेल्या ४ वर्षांत आतापर्यंत एकूण ५८ हजार २०३ कुत्र्यांवर तब्बल ४ कोटी ३ लाख ३०५ हजार रुपये इतका खर्च झाला आहे.

मागील ४ वर्षात इतकी रक्कम खर्च करुनही शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण देण्याऐवजी त्यांची संख्या आहे, तशीच किंवा वाढलेली दिसते. त्यामुळे या कामावर झालेला ४ कोटी ३ लाख ३०५ हजार रुपये ही रक्कम प्रत्यक्षात खर्च झाली की, कागदोपत्री रंगविण्यात आले, याची चौकशी करुन यामध्ये काही गैरप्रकार असेल तर संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button