breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टंकलेखन बोगस प्रमाणपत्र प्रकरण ; महापालिकेचे उच्च व तंत्रशिक्षण सचिवांना दिले पत्र

– टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध ?, माहिती देण्यास तंत्रशिक्षण परिक्षा मंडळाची टाळाटाळ 

विकास शिंदे 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील चर्तुर्थ श्रेणी वर्गातून लिपिक पदावर पदोन्नती मिळविलेल्या कर्मचा-यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे, त्यामुळे 117 कर्मचा-यांच्या टंकलेखन प्रमाणपत्रावर टांगती तलवार आहे. या प्रमाणपत्राची राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाने महापालिकेला अहवाल दिला. परंतू, टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध याबाबत स्पष्ट उल्लेख न करता या प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, महापालिकेने राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून परीक्षा मंडळ टंकलेखन प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध करुन देत नाही. त्यामुळे 117 चर्तुथ कर्मचा-यांना दिलेल्या पदाेन्नतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.  

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या, शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचा-यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती दिली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचा-यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने काही दिवसापुर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. त्याच्या शैक्षणिक अर्हतेनूसार पदोन्नती देण्यात आली. परंतू, त्यातील काही कर्मचा-यांनी पदोन्नती मिळविण्यासाठी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची बाब निर्दशनास आली. बोगस प्रमाणपत्र सादर त्या कर्मचा-यांनी ही पदोन्नती मिळविल्याची तक्रार आयुक्तांकडे प्राप्त झाली. त्यामुळे सर्वच कर्मचा-याचे प्रमाणपत्रे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा तंत्रशिक्षण परिषदेकडून खातरजमा घेण्यासाठी पाठविली होती.

दरम्यान, त्या कर्मचा-यांचा अहवाल महापालिका प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्या कर्मचा-याचा अहवालात टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे याविषयी स्पष्ट माहिती तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाने दिलेली नाही. टंकलेखन प्रमाणपत्राची योग्य माहिती न दिल्याने महापालिका प्रशासनाला त्या कर्मचा-यावर कारवाई अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन विभागाने पुन्हा राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे. चतुर्थ कर्मचा-यांना दिलेल्या पदोन्नतीत टंकलेखन प्रमाणपत्राची माहिती देण्यास परीक्षा मंडळा उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. त्यामुळे परीक्षा मंडळाने स्पष्ट अभिप्राय देवून हे टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे याविषयी सविस्तर माहिती देण्याची विनंती पत्राद्वारे केलेली आहे. यामुळे महापालिकेतील चतुर्थ कर्मचा-यांना लिपिक पदावर दिलेल्या पदोन्नतीत दोषी आढळणा-यावर प्रशासन फाैजदारी दाखल करुन सेवेतून त्यांना टाकण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button