breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन यांनी कॅनडामध्ये सुरू केलं नवीन आयुष्य

मुंबई | प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन यांनी नुकतच राजघराण्यातून शाही सदस्यत्वाचा त्याग केला. हा त्याग जाहीर होताच जगभरात यावर बरीच चर्चा रंगली. हा त्याग करत प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन यांनी आता त्यांच्या नवीन आयुष्याला कॅनडामध्ये सुरुवात केली आहे. त्यांची ही सुरुवात सुद्धा अगदी कॉन्ट्रोव्हर्शियल झाली असून त्यांनी मीडियाला एक वॉर्निंग देत ही नवीन सुरुवात केली.

https://www.instagram.com/p/B7mLP3VHPDm/?utm_source=ig_embed

मंगळवारी सकाळी मीडियाला ह्या एक्स डच आणि डचेस यांनी मेगन हिचे नुकतेच रिलीज झालेले प्रेस मधले फोटोंवर आक्षेप घेत वॉर्निंग दिली. सध्या दोघं व्हॅनकुवर आयलंडवर एका लक्झरी घरात राहात असल्याची माहिती मिळत आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन हे सध्या राहात असलेलं घर हे त्यांचा तात्पुरता निवारा आहे आणि या आधी सहा आठवडे तिथे स्थित असून त्यांनी क्रिसमस सुद्धा तिथे साजरा केला. त्यांचा मुलगा आर्ची सुद्धा त्यांच्याबरोबर इथे गेल्या सहा आठवड्यापासून राहात आहे. ८ जानेवारी २०२० रोजी या दोघांनी घेतलेला राज्य घराणं त्याग करण्याच्या निर्णयामुळे ब्रिटिश राजवटीला फारच धक्का बसलेला दिसला.

https://www.instagram.com/p/B7gdTRGHdpI/?utm_source=ig_embed

२०१८ साली लग्न बंधनात अडकलेलं हे कपल गेल्या वर्षीपासून सततच्या मीडियाच्या प्रकाशझोतामुळे त्रासलेले होतं आणि कायम मीडियाला वॉर्निंग देताना दिसलं आहे. नुकतीच त्यांची कॅनडामधील सुरुवात सुद्धा अशीच झाली असून त्यांच्या वकिलांनी मंगळवारी पब्लिश झालेल्या मेगनच्या फोटोसाठी मीडियाला कायदेशीर वॉर्निंग दिली आहे. या फोटोमध्ये मेगन त्यांच्या सध्याच्या व्हॅनकुवर मधील घरात कुत्र्यांसोबत फिरताना दिसत आहे. त्याचसोबत या दोघांचा मुलगा आर्ची सुद्धा फोटोमध्ये दिसतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button