breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात 148 कोटी ड्रेनेजचा निधी पाण्यात ; कामकाज ठप्प झाल्याने ठेकेदाराला टाकणार काळ्या यादीत

केंद्राच्या अमृत योजनेचा निधी परत जाण्याची भाजपवर नामुष्की

जलनिसाःरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाई मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गंत शहरातील ड्रेनेज  (जलनिस:रण) व्यवस्थेसाठी तब्बल 148 कोटींची निविदा काढण्यात आली. परंतु, कामाचा आदेश दिल्यानंतरही संबधित ठेकेदार व्यवस्थित काम करत नसून भाजपच्या कार्यकालातील आणखी एक महत्त्वकांशी प्रकल्प फसण्याच्या मार्गावर आहे.  काम करत नसल्याने महापालिकेने या ठेकेदाराला प्रतिदिन 40 हजार रपये दंड सुरू केला आहे. जलनिसाःरण अधिका-यांच्या नियोजनाअभावी आणि माजी स्थायी समिती सभापती दबावापोटी त्या निविदेचा घाट घातल्याने आता पश्चाताप करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदुषित होते. त्यासाठी सक्षम यंत्रणा महापालिकेला आवश्यक होती. त्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत १४८ कोटींचा प्रकल्प मंजूर झाला होता.  या प्रकल्पामुळे शहरात नव्याने ३३ एमलडी क्षमतेचे मैलाशु्ध्दीकरण केंद्र उपलब्ध होतील. त्यातून ३९६ एमएलडी सांडपाण्यावर पालिकेला प्रक्रिया करता येणार आहे. त्यासाठी मागील चालू आर्थिक वर्षात निविदाप्रक्रिया राबवून संपुर्ण शहराचे काम मे. पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराला देण्यात आले.

काम सुरू करण्यासाठी आयुक्तांकडून कामाचे आदेश 7 एप्रलि 2018 रोजी देण्यात आले. परंतु, नऊ महिने उलटले असताना संबधित ठेकेदाराकडून त्या प्रमाणात काम केले जा नाही. ड्रेनेज विभागांच्या माहितीनुसार ठेकेदाराने आतापर्यंत फक्त 7 टक्के काम केले आहेत. कामाची मुदतीच्या प्रमाणात हे काम कमी आहे. त्यासाठी पालिकेने प्रतिदिन 40 हजार रुपये दंड या ठेकेदाराला सुरू केला आहे. त्याने कामाला गती न दिल्यास दंडाची रक्कम आणखी वाढविण्याची तंबी दिली जात आहे. परंतु, 24 तास पाणीपुरवठा योजनेप्रमाणे अमृत योजनेतील हा प्रकल्प देखील महापालिकेचे कार्यकारी अभियंत्याच्या नियोजनशुन्य व भोंगळ कारभारामुळे फसणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

—————–
जुन्या २०९ किमी ड्रेनेज लाईन बदलणार 
या व्यतिरिक्त निगडी ते दापोडी रस्त्यालगतच्या गावठणात जलनिसःरण नलिका बदलल्या जाणार आहे. आकुडी, चिंचवड, थेरगाव, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, सांगवी, संत तुकारामनगर, रहाटणी, पिंपरी, भोसरी आणि काळेवाडी भागातील एकूण २०९ किमी जलनिस:ऱण नलिका बदलण्यात येणार आहेत. त्यात जुन्या नलिका बदलण्यास प्राधान्य दिले जाणार होते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button