breaking-newsपुणे

‘मॉर्निंग वॉक’ला कचरा उचलण्याची अभियंत्याची चळवळ

प्लॉगिंगची पुणे महापालिकेकडून दखल व मदत

पुणे |महाईन्यूज|

पहाटे शरीरस्वास्थ्यासाठी धावताना शहराची स्वच्छता करण्याची चळवळ पुण्यात सुरू झाली आहे. मूळची स्वीडन देशातील प्लॉगिंग संकल्पना म्हणजे प्लास्टिक कचरा उचलणे होय. हळूहळू भारतातील शहरांमध्ये ती उभी राहत आहे. शरीर रोगमुक्त ठेवण्याबरोबर शहरही स्वच्छ करण्याची चळवळ पुण्यासह नाशिक नागपूर या सारख्या प्रमुख शहरांमध्ये रुजत आहे. सकाळी धावताना ‘कूल डाऊन अॅक्टिव्हिटी’दरम्यान सोबतच्या एका पिशवीत प्लास्टिक पिशव्या,रॅपर्स आदी कचरा गोळा केला जातो. विवेक गुरव या संगणक अभियंत्याने या चळवळीची बीजे पुण्यात रोवली.

तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या सुटीचा काही वेळ सामाजिक कार्यात घालवता येईल का, असा विचार विवेक गुरवने केला. कार्यालयात पाच दिवसांच्या कामानंतर मनाला आणि शरीरालाही ताजेतवाने करण्यासाठी व्यायामाबरोबरच प्लास्टिक मुक्ती अभियानाची कास त्याने धरली. त्याने सुरू केलेल्या ‘पुणे प्लॉगर्स’ या उपक्रमातून अनेक तरुणांच्या मदतीने सहा आठवड्यांत ३६,००० किलो प्लास्टिक गोळा करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच टाकाऊ प्लास्टिकच्या काही उपयोगी वस्तू बनवण्यासाठी विनामूल्य महिलांना दिल्या जातात.

शहर प्लास्टिक मुक्त व्हावे यासाठी विवेकने पुढाकार घेत पुण्यातील तरुणांना प्लॉगर उपक्रमाची माहिती दिली. ऑक्टोबरमध्ये प्लॉगिंग चळवळ सुरू केली. गेल्या काही आठवड्यांत हिंजवडी, वाकड, दिघी, आळंदी, शिवाजीनगर परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. पुणे महानगरात सध्या या उपक्रमात एकाच वेळी ४०० तरुण सहभाग घेतात तसेच शहराच्या उपनगरांमध्येही प्लाॅगर एकत्र येऊन परिसर स्वच्छ करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button