breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मराठा समाजाची बदनामी थांबवा – खासदार संभाजीराजे छत्रपती

पुणे |महाईन्यूज|

‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास संस्था (‌सारथी) आणि त्या माध्यमातून मराठा समाजाची होत असलेली बदनामी त्वरित थांबवावी. या संस्थेला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव दिले आहे. तिची प्रतिष्ठा जपली गेलीच पाहिजे,’ अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

‘सारथी’ संस्थेबाबत सध्या दैनंदिन नवीन खुलासे आणि आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. ‘सारथी’ संस्थेत भ्रष्टाचार झाला असेल, तर ती रक्कम नेमकी किती? प्रसारमाध्यमांतून केवळ ‘सारथी’ संस्थेलाच टार्गेट केले जात आहे. कोणी भ्रष्टाचार केला असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आमच्या दृष्टीने कुणी व्यक्ती महत्वाची नाही, तर मराठा समाजाच्या हिताची ही संस्था महत्वाची आहे, असे संभाजीराजे म्हणाले. तसेच, संस्थेतील घोटाळा झाला असल्यास त्याची ‘कॅग’सारख्या नामांकित संस्थेकडून चौकशी करा. तो अहवाल सार्वजनिक करा, पारदर्शकता असलीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button